शहरातील मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा राळेगांव शहरातून जातोय आणि या वर्षभरात हा प्रमुख हमरस्ता सध्या जीवघेणा ठरत आहे. या सहा महिन्यात सहा जण जीवानिशी गेले आहे .या साठी नानाविध कारणांमुळे या दोन निष्पाप व चार कुटुंब प्रमुखांना नाहक आपले प्राण गमवावे लागले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा तयार करतांना च खूप उणीवा राहिल्या,या संदर्भात प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधी वेळोवेळी वृत्त प्रकाशित करुन संभाव्य धोके निदर्शनास आणून दिले होते.पण कोणीचं लक्ष दिलं नसल्याने आता याचे गंभीर परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. आजही चालक अती मद्य प्राशन करुन सुसाट वेगाने धावणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
रस्ता दुभाजाकावर अनेक जण आदळल्याने गंभीर जखमी झाले, तर अवजड ट्रक ने मध्ये लावलेले अनेक कठडे नामशेष केले.
दोन प्रमुख अपघातात मुख्य कारण चारचाकी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे चर्चेअंती कळतं. दोन किलोमीटर अंतराचा शहरातून जातोय.भरधाव वेगाने धावत जाणारी सर्व प्रकारची वाहने,वाहतूक नियमांचे सातत्याने होणारं उल्लंघन,पोलिस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष,चॅम्पियन्स बाईक रायडर्स चा दिवसेंदिवस वाढत असलेला हैदोस,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नॅशनल हायवे वर गतिरोधक बसविण्यात केलेली मनाई, मधोमध असलेले पथदिवे अर्ध्या दूर पर्यंत बंद चं, रस्ता दुभाजाकाने दोन फूट अंतर व्यापलयं,
दोन्ही बाजूला असलले अतिक्रमीत व्यवसाय धारक आणि दुकानां समोर वाहनांची भाऊगर्दी,सह बेशिस्त या महत्त्वाच्या बाबीं अपघाता साठी कारणीभूत आहे.
आता या साठी काय कायमस्वरुपी उपाय योजना,जेणेकरून जीवितहानी टळतील अशी खमठोक भूमिका विद्यमान खासदार, आमदार,नगर पंचायत राळेगांव,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,सार्वजनिक बांधकाम विभाग सह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेणे आवश्यक आहे.