पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीला यवतमाळ पोलिसांकडून अटक {पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांची पत्रकारं परिषदेत माहिती }

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व राळेगाव पोलिसांच्या संयुक्तीत कारवाईत मातानगर राळेगाव येथे चोरी करणार्यांना आदिलाबाद येथून अटक करण्यात आली.
फिर्यादी व त्याचे सोबत काम करणारे पाच लोक मिळून घरी हजर असताना अंदाजे बारा वाजून तीस मिनिटांनी खाकी पॅन्ट काळे बूट व्हाईट शर्ट व इतर दोन इसम घरात आले व तुम्ही लोक गांजा विक्री करून पैसे जमा करतात असे सांगितले तसेच तुमच्या घरची झडती घ्यायची आहे असे सांगून त्यांना घराची झडती घेऊन घरात ठेवलेले पेटी मधील दोन लाख रुपये नगदी व फिर्यादी तसेच त्यांच्या मित्रांचे 6 मोबाईल किंमत 74 हजार रुपये असा एकूण दोन लाख 74 हजार हे पोलिस स्टेशन ला जमा करावे लागतील असे सांगून घेऊन गेले. त्यानंतर फिर्यादी यांना शंका आल्याने त्यांनी राळेगाव पोलीस स्टेशनला जाऊन सदर प्रकरणाबाबत चौकशी केली असता, राळेगाव पोलिसाकडून किंवा जिल्ह्यातील कोणत्याही पोलिसाकडून अशी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने, फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने तक्रार केली तक्रारीवरून पोलीस स्टेशन राळेगाव येथे अपराध क्रमाक्र157 ऑब्लिक 2021 कलम 170, 417, 411, 34 भांदवी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरची कार्यवाही डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ ,खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, यांचे आदेशाने प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ,संजय चोबे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राळेगाव यांच्या मार्गदर्शनात ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुळे ,उपपोलीस निरीक्षक मोहन पाटील, गोयल वास्टर पोलीस उपनिरीक्षक, योगेश रंधे उत्तम कुरकुटे ,पेशा सलमान शेख सुधीर ,पिदुरकर किशोर झेंडेकर सर्व स्थानिक तसेच, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी सायबर सेल यवतमाळ यांचे पथकाने ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली.