
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी निवडीची प्रक्रियीसाठी गुप्त घडामोडी मागील काही महीन्यापासून सुरु होत्या. यामध्ये जिल्हातील काँग्रेसचे बरेच इच्छुक जेष्ठ नेत्यांकडून फिल्डींग लावून होते. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून अँड. प्रफुलभाऊ मानकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आ.वजाहत मिर्झा यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाला होता. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे इतर मंडळांच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या असल्याने त्यांनी नविन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यासंदर्भात जेष्ठ नेतेमंडळींना सुचित केले होते. त्यानुसार मागील दोन महिन्यांच्या जास्त काळापासून जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधील इच्छुकांकडून फिल्डींग लावली जात होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज प्रभारी जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून त्यात यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून ॲड. प्रफुल भाऊ मानकर, मालेगाव शहर जिल्हाध्यक्ष पदी एजाज बेग अजीज बेग व नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी आ. शिरिषकुमार नाईक यांची नियुक्ती केली आहे.
