
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पळसकुंड येथे वीज कोसळून चार जण जखमी झाले,पावसाळ्याला सुरवात झाली असून शेतकरी आपल्या शेतात पिकाची लागवड करित आहे,पळसकुंड येथे पिकाची लागवड करीत असताना दुपारी 3 वाजता विजासहित पावसाला सुरुवात झाली ,तेव्हा वीज कोसळून चंद्रभान आय्या आत्राम,हरिवाडी घोसले, अनिल घोसले,विजय मेश्राम हे 4 जण जखमी झाले .जखमी झालेल्या लोकांना उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे भरती करण्यात आले,परंतु भरती केलेल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले ,मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दामिनी अँप चा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केले ,ज्यामुळे या प्रकारच्या घटना टाळता येतील ,या अँप मुळे आपल्याला 15 मिनिट अगोदर पूर्व सूचना मिळते.
