पारवा पोलीसांनी केली अवैध दारू ची वाहतूक करणा-या वाहनासह टोळी जेरबंद

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोटी येथे पहा अडीच वाजता च्या सुमारास घाटंजी कडून पाटापांगरा कडे जात असलेल्या ओमणी कार वर पोलीसांना संशय आला सदर ओमणी वाहणाची कसून चौकशी केली असता त्यामध्ये तिस बॉक्स देशी दारू अैवध रित्या वाहतूक करत असल्याचे दिसून आले यामध्ये तिस बॉक्स दारू ची किंमत पंचान्नव हजार पाचशे रुपयाच्या दारू सह ओमणी कार व एक दुचाकी किंमत असा एकूण सहा लाख पंच्चानव हजार नऊशे सत्तर रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पारवा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक गणेश राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी चांदोरेनगर यवतमाळ येथील नामे शुभम रमेश जयस्वाल विशाल विठ्ठल शेंडे कुणाल विजय तांदूळकर यांच्यावर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे ही कारवाई पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद चव्हाण, गणेश राठोड, संदीप महाजन, चालक संजय पांडे घोटी येथील नागरिक अरविंद राठोड, महादेव राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.