शिवसेना राळेगाव पदाधिकारी व नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष नगर पंचायत राळेगाव यांनी पालकमंत्री संदिप जी भुमरे साहेब यांची विकास निधी साठी भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दि १ मे महाराष्ट्र दिनी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ मा.श्री. संदिपानजी भुमरे साहेब यवतमाळ येथे आले असता तालुका शिवसेना प्रमुख विनोद काकडे , शिवसेना शहरप्रमुख राकेश राउळकर , राळेगावचे कांग्रेसचे नगराध्यक्ष श्री.रविन्द्र मेश्राम,कांग्रेसचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती श्री जानरावजी गिरी, शिवसेनेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापति श्री. संतोष कोकुलवार यांनी राळेगाव शहरात विविध विकास कामे निधि अभावी थांबलेली असल्याबाबतचे निवेदन दिले. याप्रसंगी मंत्री महोदय यांच्याशी विविध योजनेसाठी लागणारा निधी याविषयी चर्चा केली तसेच अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत, पाणी पुरवठा योजना , सांस्कृतिक भवन, शहरातील काही भागात कमी दाबाचे ट्रान्सफार्मर , रखडलेली घरकुल योजना, मटन मार्केट , शहरातील अंतर्गत रस्ते, राळेगाव येथील तलावाचे सौन्दर्यीकरण, रावेरी येथील सितामाता मंदिरचे निधी, हे मुद्दे प्रामुख्याने होते आणखी काही विषयावर सविस्तर चर्चा झाली . काही विषय मंत्री महोदयानी त्वरीत मार्गी लावले व राहिलेले मुद्दे मार्गी लावण्या संदर्भात निर्देश दिल्या जाईल याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संतोषभाऊ ढवळे व नितीनभाऊ बांगर उपस्थित होते. प्रस्तावित विकास कामाच्या निधीसाठी संबंधित मंत्री महोदयाना व वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कांग्रेस नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मंत्रालय, मुंबई ला जाणार आहे.