आज यवतमाळ येथे आंदोलन करुन महावसूली आघाडीच्या संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवत गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली!

प्रतिनिधी:नितेश ताजने,यवतमाळ

‘गृहमंत्री यांनी स्वतःच सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते’ असे मुंबई चे माजी पोलीस आयुक्त श्री परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं ज्यांची जबाबदारी होती त्यांनीच वसुलीचे रॅकेट चालवण्याचे आरोप तेही खुद्द तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आहेत. लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास अबाधित रहावा यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं आणि सदरील आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे.

एकीकडे सर्वसामान्यांना वाढीव वीजबिल पाठवून सावकारी वसुली चालू आहे. कोव्हीड केअर सेंटर ची वीज कापण्यापर्यंत निष्ठुरता झिरपली आहे. तर दुसरीकडे गृहमंत्र्यांच्या आशिर्वादानेच वसुली रॅकेट चालू आहे. आज यवतमाळ येथे यवतमाळ जिल्ह्याचे नेते श्री मदन भाऊ येरावार श्री नितिन भाऊ भुतडा (जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ)नेतृत्वाखाली आंदोलन करुन संवेदनाशून्य, भ्रष्ट आणि अनैतिक कारभाराचा निषेध नोंदवला.या वेळी आमदार अशोक उईके, आ. नामदेव ससाने,आ.निलय नाईक, जिल्हा माहमंत्री रवि बेलुरकर, राजु पडगिलवार, दत्ता राहणे, यवतमाळ शहर अध्यक्ष प्रशांत येदव जिल्हा सचिव शंकर लालसर, जिल्हा भाजपा यवतमाळ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता बंधू उपस्थित होते

एक मात्र खरे आहे; महाविकास आघाडीतील विकास हा विकास नसून ‘वसुली’ आहे!