वाळूची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला

संग्रहित फोटो

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

बोगस रॉयल्टीचा आधार घेऊन वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टिप्परला महसूल तथा पोलिसांच्या पथकाने नाका तपासणी दरम्यान ताब्यात घेतले आहे. हि कारवाई आज २३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. प्रशासनाच्या एक्शन मोडमुळे वाळू तस्करांनी चांगलीच धास्ती घेतली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.मारेगांव तालुक्यातील आपटी तसेच कोसारा हा वाळू घाट लिलाव झाला असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळू ची वाहतूक सुरू आहे. नियमाप्रमाणे वाहतो व्हावी यासाठी तालुका महसूल प्रशासनाने वडकी येथील खैरे मार्गावर तपासणी नका उभारला. या तपासणी नाक्यावर आपटी कडून खैरी वडकी मार्ग पांढरकवडा कडे जाणाऱ्या एम एच 31 सी बी 5933 या टिप्परची तपासणी केली असता त्यात साल का जवळ असलेल्या वाळूच्या परवाना बोगस असल्याचे आढळून आल्याने सदर टिप्पर वडकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. ही कारवाई महसूल प्रशासनाने मंडळ अधिकारी पोटे,तलाठी गिरीश खडसे,दिलीप चिडे यांच्या सह पोलीस कर्मचारी बसेशंकर यांनी केली.गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोसारा या वाळू घाटातून वाळूचा उपसा बंद असल्याचे दिसत आहे.