विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी सौ.अंजुताई चिलोरकर यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ महिला शाखा जिल्हा अध्यक्ष सौ अंजुताई चिलोरकर यांची नियुक्ती मासिक मिटींग मध्ये एक मताने करण्यात आली. मासिक सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भवादी नेते मा.ॲड.वामनराव चटप (माजी आमदार ) मा.रंजनाताई मामर्डे अध्यक्ष विदर्भ प्रांत (महिला आघाडी )मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती ह्यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते

सभेच्या आयोजनात पुढाकार आणि सहकार्य अशोकराव कपिले जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती शहर अध्यक्ष ॲड अजय चमेडीया अरुण भाऊ जोग अध्यक्ष जय विदर्भ पार्टी यवतमाळ श्रीधर ढवस अशोकराव कारमोरे प्रल्हाद काळे सोनाली मरगडे लताताई जयस्वाल चारुदत्त नेरकर गौतम साहेब गजानन चौधरी सर्व सहभागी सदस्यांच्या उपस्थितीत मासिक सभा पार पडली.सभा संपल्यानंतर नियोजित पत्रकार परिषद घेण्यात आली होती.