
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
निवडणूक ही कोणती असो मतदारांनी दिलेला कौल हा अंतिम असतो या यशाचे शिल्पकार जनसामान्य मतदार जनता असते कोणी राजकीय पक्षांचे पुढारी नसतात म्हणून पुढाऱ्यांनी फुकट आपल्या हाताने आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारु नये
राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांना धुळ चारली हा पक्षाचा चमत्कार आहे असं म्हणायचं का ? की जनसामान्य लोकांनी घेतलेला निर्णय म्हणावां ही दिलेली संधी आहे हा जनसामान्य लोकांनी घेतलेला निर्णय आहे हे जन सामान्य लोकांचं यश आहे
निवडणूक आलेले सर्व उमेदवार जरी सिंबॉलिक असेल तरी आता ते सर्व सामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी झाले आहे लोकांनी दिलेली संधी आहे म्हणून आता जनतेच्या हीताच्या कामासाठी कटीबद्ध आहे आणि आता पक्ष बाजूला ठेवून जनविकासाचे कार्य केले पाहिजे ही संधी पाच वर्षे आपल्याला मिळाली आहे म्हणून योग्य जनसामान्य लोकांचें कामं करत रहा नाहीतर जनताचं सत्ता परिवर्तन घडवून आणु शकते हे सत्य नाकारता येणार नाही
असे स्पष्ट प्रतिक्रिया मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी व्यक्त केले आहे.
