कोठोडा येथे भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत नरसाळा येथील एक युवक ठार तर एक गंभीर जखमी

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225

पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील केळापूर येथून देवीचे दर्शन घेवून नरसाळ्याकडे परतीचा प्रवास करत असताना कोठोडा जवळी पुला जवळ अज्ञात वाहनाने मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी ला धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला.

काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त दुचाकी (एमएच 29 एन ८०६२ ) केळापुर वरून दुचाकीने कोठोडाच्या दिशेनं जात होती. या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या राहुल याला उपचारासाठी करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करून वैद्यकीय अधिकारी याच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे .शंकर बाळू माहुरे(२१) रा. नरसाळा हा जागीच ठार झाला तर राहुल मेश्राम (२५) रा.सखीकिसनपुर ता. राळेगाव हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे गुरुवारी सांयकाळी केळापुर येथे देवीचे दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी त्यांनी दर्शन घेतले आणि ते आपल्या गावाकडे परतत होते. केळापुर सोडल्यानंतर त्यांनी भरधाव वेगाने दुचाकीने पळवायला सुरुवात केली. शंकर माहुरे हा दुचाकी वाहन चालवित होता. राज्य महामार्गावर कोठोडा नजीक अज्ञात वाहनाने धडक दिली. असल्याने एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे या घटनेची
माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातात ठार झालेला शंकर हा मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील रहिवासी आहेत. याघटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहे.