भाड्याने दिलेला ट्रॅक्टर 4.50 लाखात परस्पर विकला!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    

भाड्याने दिलेला ट्रॅक्टर मूळ मालकाला कोणतेही माहिती न देता परस्पर विकून 4.50 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार संबधित मालकाने राळेगाव पो. स्टे.दिलेल्या तक्रारीने राळेगाव शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितनुसार अक्षय सुभाष ठाकरे. 34वर्ष.रा. वरणा तालुका राळेगाव जि. यवतमाळ यांचे मालकीचा ट्रॅक्टर गैर अर्जदार नामे भोला संभाजी धनकसांर 35 वर्ष. रां.राळेगाव.याने सबंधितांचा ट्रॅक्टर 20000 प्रती महिना या भाडेतत्त्वावर नोव्हेंबर 2021 रोजी भाड्याने दिला असता ट्रॅक्टर चेसिस क्र.KBTB30TNCMTH 38822व इंजिन क्र.IMG8959 हा गैरअर्जदार क्र.1 ने गैर अर्जदार क्र.2 नामे दिपक बाळासाहेब मोरे रा. नाशिक जिल्हा नाशिक याला चार लाख पन्नास हजार रुपयाला विकला. सदर ट्रॅक्टर च्या मूळ मालकाला कोणतीही माहिती न देता परस्पर विक्री करून फसवणूक झाल्याने सदर ट्रॅक्टर च्या मालकाने रीतसर तक्रार राळेगाव पो.स्टे.मध्ये करून माझा ट्रॅक्टर मला परत मिळावा व संबधित फसवणूक करणाऱ्यां वर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत केली आहे.