तेरा जागे साठी एकोणतीस नामांकन दाखल ,ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव ची निवडणूक चुरशीची?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २९ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २९ जणांनी अर्ज दाखल केला.छाननी अंती सर्व नामांकन जैसे थे च आहे.
या संस्थेमध्ये ११००च्या वर मतदार आहेत. १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. २९ एप्रिलला अर्जाची छाननी होणार आहे. २ ते १७ मेदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १८ मेला चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यानंतर गरज भासल्यास २९ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी मतमोजणी केली जाणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर सेवा सहकारी .. सोसायटीची निवडणूक होत आहे. तालुका मुख्यालयी असलेली ही सर्वात मोठी सोसायटी आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून या सोसायटीवर आपले बर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यमान गटाविरोधात विरोधकांची जोरदार तयारी चालू आहे…
या वेळी काँग्रेस पक्षाचे सर आणि भाऊ एकत्र असल्याने,ही सोसायटी परत एकदा काँग्रेस पक्षा कडेच राहील असेच संकेत सध्या तरी दिसत आहे.