
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेड येथे covid-19 अंतर्गत वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविशिल्ड लस देण्याचा उपक्रम यशस्वीरित्या या महाविद्यालयात पार पाडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज चे प्राचार्य श्रीकांत लाकडे सर, प्रमुख पाहुणे डॉ प्रतीक वाघमोडे साहेब (M.O), प्रमुख मार्गदर्शक अनुज राजेंद्र संगीतराव (समुदाय आरोग्य अधिकारी), प्रमुख उपस्थिती आरोग्य सेविका जे .जे कुमरे, कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, एक.एन.काझी, एम डी कावडे, आर एल हिवरकर, परचाके मॅडम, कडू मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी आर एस फुटाणे, एस एन कांबळे, यु पी तेलंगे व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे,
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली… सूत्रसंचालन कुमारी साक्षी झाडे हिने केले.. शब्द सुमनाने स्वागत करून कॉलेजचे प्राचार्य लाकडे सर यांनी covid-19 त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले, प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रतिक वाघमोडे यांनी लसीकरणाची विद्यार्थ्याच्या मनातील भीती घालून लसीचे काय फायदे तोटे आहे हे विशद केले, पाहुणे संगीतराव सर यांनी प्रास्ताविक देऊन या उपक्रमाची सुरुवात केली व त्यांनी विद्यार्थ्यांना उस्फुर्त करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यास विद्यार्थ्यांना आव्हान केले, आरोग्य सेविका कुमरे ताई यांनी प्रत्यक्षदर्शी जे अनुभवलेले आहे ते सांगून लसीकरण किती महत्त्वाचे आहे ते सांगितले,
मार्गदर्शनपर कार्यक्रम झाल्यावर प्रत्यक्ष विद्यार्थी-विद्यार्थिनी ला लस टोचून या कार्यक्रमाचा शेवट झाला, 165 विद्यार्थ्यांपैकी आज रोजी बुधवार ला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन लसीचे डोज घेतलेले आहे..बाकी विद्यार्थ्याचे पहिला डोज घेतलेले 15 विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांचा भरगोस प्रतिसाद मिळाला , लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नोडल शिक्षक म्हणून काझी सर,व परचाके मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली होती… विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने झाला प्रदर्शन अपर्णा कुबडे हिने केले.
लस घ्या लस घ्या… कोरोना लस घ्या,,,,
