
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
नुकतीच घाटी घाटंजी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून.त्या साठी निवडणूकीची पुर्व तयारी म्हणून दत्त माध्यमिक विद्यालय अंजी नृसिंह येथे शेतकरी सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी बाबासाहेब गाडे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीशभाऊ भोयर, जितेंद्रबाबु ठाकरे, महेश पवार, मोरेश्वर वातीले होते. या वेळी बाबासाहेब गाडे पाटील यांनी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. मी १९८७ मध्ये या संस्थेचा संचालक होतो, त्या वेळी आम्ही सर्वांनी संस्था भरभराटीला आणली होती, मात्र आता ही संस्था डबघाईस आलेली आहे. हि शेतकऱ्यांची संस्था भरभराटीला यावी, या साठी शेतकरी विकास पँनल निवडणूक लढत आहे. शेतकऱ्यांनी यांना भरभक्कम पणे पाठिंबा देऊन निवडून द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सतीशभाऊ भोयर, जितेंद्रबाबु ठाकरे, महेश पवार, मोरेश्वर वातीले, सतीश मलकापूरे यांनी निवडणूक संदर्भात शेतकरी सभासदांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद रफीकबाबु यांनी केले तर संचालन विश्वास निकम यांनी केले.सुरेश कुडेगावे, बंडू तोडसाम, अंकुश ठाकरे, राम खांडरे, यांनी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या वेळी सुभाष राठोड, अनिल खोडे, गिरीधर राठोड, गजानन भोयर, हेमसींग राठोड, रविंद्र खवास, मोहन प्रधान, अशोक बारहाते, प्रमोद अडलवार, विजय रंधयी, रमेश पडलवार सह अनेक शेतकरी सभासद उपस्थित होते.
