
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दिग्रस मतदारसंघातील नेर येथे माजी मंत्री आमदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत नेर तालुक्यातील व शहरातील शिवसेना पदाधिकारी मेळावा पार पडला.ह्या मेळाव्यात शिवसेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.ह्या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदाताई पवार,शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधरकाका मोहोड,जिल्हा प्रमुख पराग भाऊ पिंगळे महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे,तालुका प्रमुख मनोज नाल्हे,शहर प्रमुख दीपक आडे,पंचायत समिती सभापती सिंधुताई चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव ढवळे,जिल्हा नियोजन समिती सदस्य हरिहर लिंगनवार,जेष्ठ मार्गदर्शक परमानंद अग्रवाल,जेष्ठ मार्गदर्शक नामदेवराव खोब्रागडे,महिला आघाडी तालुका प्रमुख वैशालीताई मासाळ,शहर संघटिका अर्चनाताई इसाळकर ताई,शहर संघटिका रश्मीताई पेटकर व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगर सेवक,शाखा प्रमुख,शाखा पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
