
ढाणकी/प्रतिनिधी:
ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजे नारळी येथे दोन हजार रुपये किमतीची तब्बल २० लिटर गावठी हातभट्टी दारू, बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांचे मार्गदर्शनात बिट जमादार गजानन खरात, दत्ता कुसराम, निलेश भालेराव यांनी घटनेची माहिती मिळताच धडक कारवाई करून जप्त केली. यामध्ये आरोपी रंगराव जळबा आढाव यांचे विरुद्ध कलम ६५ इ ६५ फ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
