प्रबोधनासोबत यशस्वी ठरला ईद ए मिलादुन्नबी निमित्त पैगंबर मोहम्मद यांचा मानवीय दृष्टीकोण व अन्य धर्मीयांसोबत व्यवहार यावर विशेष कार्यक्रम

वरोरा शहरात मराठी मुस्लिम सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय ईद ए मिलादुन्नबी चहा पर्वावर सर्व धर्मीय प्रबोधन संमेलनाचे नगर भवन येथे आयोजन करण्यात आले .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य चे ज्ञानेश्वर रक्षक ,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जावेद पाशा कुरेशी ,मुख्य अतिथी मौलाना प्रा.मोहम्मद जुबेर ,नागपूर ,मा.ना. गो.थुटे सर ,मुख्य वक्ते रवीदादा मानव (मोझरी गुरुकुल) ,मा.विलासभाऊ नेरकर,छोटुभाऊ शेख,मा.नगराध्यक्ष अहेतशाम अली, डॉ.नगराळे इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

मौलाना जुबेर यांनी म्हटलं आहे की पैगंबर मोहम्मद यांनी मानव जातीच्या भल्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले ,शेजारी कोणत्याही धर्माचा असेल तरी त्याला कोणताही त्रास न होता एकत्र येत समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहचुन त्याच्या भल्यासाठी काम करा असा सामाजिक संदेश पैगंबर मोहम्मद यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य चे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले की पैगंबर मोहम्मद यांनी फक्त एका धर्मासाठी नव्हे तर समस्त मानवासाठी आहे. इस्लाम धर्म हा कोणत्याही धर्माला विरोध करत नाही,सर्व मानव जातीच्या भल्यासाठी काम असा उल्लेख कुराण या पवित्र ग्रंथामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
मोझरी येथील गुरुकुल आश्रम चे रवीदादा मानव यांनी कुराण मधील आयत चा संदर्भ देत बंधुभावाचे आदर्श असे उदाहरण दिले.देशभरातील सर्व संत साहित्याला उलगडून सर्वांनी एकत्र येत गुणागोविंदाने रहा असा संदेश दिला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. जावेद पाशा यांनी शिक्षण, व्यापार ,स्त्री पुरुष समानता, तसेच मुस्लीम धर्माविषयी समाजात असलेला चुकीचा समजखोडून काढला.या कार्यक्रमाला मोठया संख्येने वरोराकरांची उपस्थिती होती.