धक्कादायक:वरोरा शहरातील या भागातील पाणी पिण्यासाठी अयोग्य,सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल

,नगर परिषद वरोरा शुद्ध पाणी पुरविण्यात अपयशी

मागील काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याविषयी वरोरा नगर परिषद मध्ये तक्रारी येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळातून अळ्या आल्याच्या घटना घडल्या आहेत.वरोरा शहरातील चिरघर प्लॉट या भागातील रहिवासी गढूळ व अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे कावीळ झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.त्यानंतर नगर परिषद वरोरा तर्फे त्या भागातील कावीळ बाधितांना नगर परिषद तर्फे मदत ही देण्यात आली.हि मदत निधी देत नगर परिषद वरोरा ने हे मान्य केले की नळातून होणाऱ्या दूषित ,गढूळ ,अशुद्ध पाण्यामुळे च कावीळ झाला हे मान्य केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा पिण्याच्या पाण्याविषयी समस्या घेत निवेदन दिलें,मडका फोड आंदोलन केले.तरीही वरोरा नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही .नगर परिषद वरोरा तर्फे केला जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा नमुने घेऊन पाणी पिण्या योग्य आहे की अयोग्य हे तपासून पाहावे अशी मागणी केल्याने वरोरा शहरातील अभ्यंकर वॉर्ड,कॉलरी वॉर्ड,शिवाजी वॉर्ड या भागातील नगर परिषदे च्या नळातून पाण्याचे नमुने घेत आरोग्य विभागाकडून तपासणी केली असता हे नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचे दिसून आले .नगर परिषद वरोरा चे वरोरा वरोरा करांच्या आरोग्यसोबत खेळ करत आहे असे दिसून येत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केला नसता तर हे सत्य देखील पुढे आले नसते अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.