राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकरी पुत्रानी विष प्राशन करून जिवन यात्रा संपविली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकरी पुत्र अक्षय देविदास नारनवरे वय २२ वर्ष यांनी दिनांक १९ नोव्हेंबरला आपल्या राहते घरी विष प्राशन करून आपली जिवन यात्रा संपविली. त्याच्या मृत्युमुळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जावुन मृतक अक्षय देविदास नारनवरे याचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असुन वडकी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.