
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)
सरपंच सेवा महासंघ तसेच सरपंच माझाच्यावतीने गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी रणरागिनी पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये कोपरी वालधूर गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीणभाऊ नरडवार यांना रणरागिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुष या सर्व मान्यवरांचा माझी शिक्षण मंत्री व आदिवासी महामंडळाचे उपाध्यक्ष वसंतभाऊ पुरके व कल्पनाताई पुरके तसेच सरपंच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ घोगरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला बाजार समितीचे सभापती प्रफुल्लभाऊ मानकर, बीसीएमचे संचालक अरविंदभाऊ वाढोणकर, महिला बालकल्याण सभापती जयाताई पोटे, किशोरभाऊ धामंदे तर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अंकुशभाऊ मुनेश्वर आदी उपस्थित होते.
