
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ४ फुट लांब आणि १ फुट रुंद पायाचे हाड,३ फुट लांब बरगडी चे हाड आढळले असून त्यांचा आकार पाहता ते डायनोसोर ह्या विशालकाय प्राण्याचे दिसते परंतु तेथील भूस्तर पाहता हे १५-२० हजार वर्षापूर्वीच्यां दुर्मिळ हत्तींचे असावे असा अंदाज चंद्रपूर येथील भुशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुळाना गावाजवळून वर्धा नदी वाहते, नदीच्या पात्रात काही ठिकाणी मागील हिमयुगीण काळात महापुरात वाहत आलेलां दगड-गाळाचा थर आहे. तर त्याच ठिकाणी ६ कोटी वर्षाच्या कालातील बेसाल्ट खडकाचे थर आहेत. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण होते. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडक आढळली होती,परंतु ही हाडे किंवा दगड आहे किंवा काय हे त्यांना कळले नसल्याने त्यांनी चंद्रपूर तेथील भुशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांचेशी संपर्क करून येथे संशोधन करण्याची गरज व्यक्त केली.२९ नोवेम्बर २०२१ रोजी त्यांनी जीवाश्म स्थळी भेट देवून निरीक्षणे केली असता ती हाडे हे जीवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज व्यक्त केला.
ह्यातील मोठे जीवाश्म हे ४ फुट लांब मांडीचे हाड आहे,आणि जवळच छातीच्या बरगडीचे ३ फुट लांब हाड आढळले .हाडाच्या आकारावरून हा प्राणी १५ फुट उंच आणि आणि २० फुट लांब असावा. ह्यावरून हा जीव एकतर डायनोसोर किंवा विशाल आकाराचा हत्ती असला पाहिजे .इथे गेल्या काही वर्षापासून रेती उत्खननाचे कांम सुरु असल्याने काही हाडे पाण्यात फेकली असल्याचे गावकऱ्याचे मत आहे, तर काही जीवाश्मे फेकन्यात गेली असावी असे चोपणे ह्याना वाटते.हे जीवाश्म अगदी नाजूक आणि कच्चे असल्यामुळे ते काही १५-२० हजार वर्षादरम्यानाचे असावे असा अंदाज व्यक्त केला. आकारावरून ते Giant dinosaurs विशालकाय डायनोसोर चे असल्याचे वाटते परंतु ज्या गाळात ते आढळतात आणि जितके ते जीवाश्म नाजूक आहे त्यावरून आणि त्यांना अलीकडे ह्याच नदीत सापडलेले हत्तीच्या दातांचे पुरावे ह्यावरून ते हत्तीचे असावे असा अंदाज प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केला.त्यांनी भुशास्त्र विभागाला ह्याबाबत कळविले असून त्यांच्या सर्वेक्षन आणि प्रयोगशाळेतील तपासणी नंतरच ते जीवाश्म नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे आणि काळ कोणता आहे ते कळेल.
चंद्रपूर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या Geographical Museum ‘भौगोलिक संग्रहालय’ असे म्हटल्या जाते.येथील बहुतेक तालुक्यात जीवाश्मे आढळली आहेत,ह्यातील सर्व जीवाश्मांचे नमुने विध्यार्थी आणि संशोधकांसाठी, सुरेश चोपणे ह्यांच्या संग्रहालयात,उपलब्ध आहेत. वरोरा तालुक्यात ह्यापूर्वीही डायनोसोर ची जीवाश्मे सापडली होती आणि अधून मधून खोदकामात अशी जीवाश्मे आढळत असतात. जीओलोंजीकल सर्वे ऑफ इंडीआ तर्फे त्वरित सर्वे आणि संशोधन करून येथील भूतकाळातील सजीवांची माहिती घ्यावी.नागरीकांनी सुद्धा अश्या प्रकारची खडक सापडल्यास समन्धित अभ्यासकास आणि भुशास्त्र विभागास माहिती द्यावी आणि त्यांचे संरक्षण करावे असे आवाहन जीवाश्म संशोधक सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.
