आरसीएआर परीक्षेत देशातून प्रथम येणाऱ्या अजयच्या पाठीवर कौतुकाची थाप, डॉ,विष्णू उकंडे यांनी घरी जाऊन केला सत्कार

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील शेतकरी एकनाथ करमाळे यांचा मुलगा अजय करमाळे हा इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च कृषी अनु संशोधन मध्ये डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात देशातून ओबीसी प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांक व इतरामधून पाचवा क्रमांक पटकाविला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चालना मिळण्यासाठी विष्णू उकंडे त्यांनी स्वतः तूपटाकळी या गावात जाऊन अजय चा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. व भविष्याच्या वाटचालीकरिता अजयच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या भेटीदरम्यान शेतकरी पुत्र असलेल्या अजयने नोकरी न करण्याचा निर्णय व शेतीला पूरक व्यवसाय या त्यांचे सांगण्यावरून देशातून प्रथम आलेल्या विद्यार्थी तालुक्यासाठी उद्योजक म्हणून समोर यावा व गुजरातच्या अमोल दूध डेरी सारखा उद्योगाना चालना मिळावी, शिवाय गावातील व तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनी अजय पासून प्रेरणा घ्यावी. असे मत डॉ.उकंडेनी व्यक्त करताच भेटीतील प्रयत्न स्तुत्य आहे. अशी चर्चा गावात सुरू आहे.
या भेटी दरम्यान डॉ.राजेश देशमुख,शिवसेना उपतालुका प्रमुख विठ्ठल गुंडवाळे, सुनील साबळे,बालाजी ठाकरे,विलास निकम उपस्थित होते.