हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीच्या औचित्याने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान.

  • Post author:
  • Post category:वणी

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवसी अभियानाचा शुभारंभ.

शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात , घर तिथे शिवसैनिक अभियानाला यशस्वी करण्याचे राजू तुराणकर शहर प्रमुख यांचे आवाहन.

येणाऱ्या वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरपालीकेवर भगवा फडकवुन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे करिता शिवसेना वणी शहर च्या वतीने घर तिथे शिवसैनिक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद नेरकर मुंबई,वणी विधानसभा संपर्कप्रमुख विनोद पेडणेकर मुंबई शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने शिवसेनेचे यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या जन्मदिनी “घर तिथे शिवसैनिक” या शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे. तरी सर्व उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन घर तिथे शिवसैनिक या अभियानाला यशस्वी करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केले आहे.