
मुकुटबन सहसा दृष्टीस न पडणारा वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी भारतीय अंडीखाऊ सर्प (इंडियन एग इटर) हा सर्प (Indian Egg Eater Snake) मुकुटबन शहरातील वॉर्ड नं.5 मधी रहिवासात सुरक्षित रेस्क्यू (Rescue) करण्यात आला हा साप वनरक्षक कुणाल सावरकर यांच्या निगराणीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आला
घरा बाहेर साप असल्याचा कॉल वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र संतोष गुम्मुलवर यांना आला. त्यांनी तात्काळ त्याचा टीम सोभत त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान सर्प अंगणात शोध घेतला असता सर्प दिसून आला नेहमी पेक्षा वेगळा वाटल्याने यांनी त्याचे निरीक्षण केले असता तो भारतीय अंडीखाऊ सर्प असल्याचे जाणवले. त्या सर्पाला सुरक्षित रित्या रेस्क्यू करून संस्थेच्या रेकॉर्ड ला नोंदी साठी त्याचे छायाचित्र घेऊन वनविभागाच्या निगराणीत सुरक्षित ठिकाणी मुक्त करण्यात आले.
झाड-झुडपे ,मोकळी मैदाने खूप होती, शेती शिवार मुबलक होते, बांधावरील लहान मोठ्या झाडांवर बुलबुल, मुनिया, सुगरण, नर्तक, चिमणी, सुभग, होला या सारखे पक्षी घरटी करून राहत असत. त्यांची अंडी खाऊन हा सर्प आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. परंतु या झाडांची कत्तल, कपाशी, तूर, भेंडी, सारख्या पिकांवरील कीड, अळ्या खाण्यासाठी सोयीचे ठरते म्हणून शिंपी पक्षी, सुर्यपक्षी शेतातच घरटी करत.आता शेतात रासायनिक फवारणी होत असल्याने या पक्षांनी शेतांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर शेताचे बांध पेटवले जात असल्याने भारतीय अंडीखाऊ सर्पाच्या अधिवसाला धोका पोचत असल्याचा निष्कर्ष संस्थेच्या अभ्यासकांनी काढला आहे असे संस्थेचे सचिव नितीन मनवर यांनी सांगितले या वेळेस सोबत निसर्ग मित्र संतोष गुम्मुलवर, जगदीस कुडलवर, कार्तिक नाईनवार तथा संस्थचे अध्यक्ष राजेश आंबेकर हे होते .
