वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली

वणी( 9 मार्च ) :- वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत पाठवण्यात आले आहे. तर वणीच्या ठाणेदारपदी यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतीलच पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांना तात्पुरता देण्यात आली आहे अशी देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.तसेच वणी पोलीस ठाण्यातील सपोनि माया चाटसे यांच्याकडे निर्भया पथक वणी उपविभागीय अतिरिक्त कार्यभार म्हणून देखील देण्यात आला आहे .

” मागचा महिन्यात आय जी चमूने वणी येथे धाडसत्र अवलंबले होते. यामध्ये मटका अड्डावर धाड टाकून 42 जणांना ताब्यात घेतले होते तर 4 लाखाचा सुगंधित तंबाकू जप्त करण्यात आला होता. परंतु ठाणेदार श्याम सोनटक्के हे रुजू होताच त्यापेक्षा अनेक कारवाया देखील केल्या आहेत त्या रेकॉर्डला देखील आढळतात.त्यांनी स्वतःदुचाकीने जाऊन अनेक मटका अडयांवर धाड टाकली ….पण तरीही आयजी चा धाडीने त्यांना कसुरवार ठरवून उचलबांगडी झाली असेल तर असे होणे कितपत योग्य? असे अनेक प्रश्न या निर्णयामुळे उभे राहिले आहे…….” याचा अर्थ असा की ,या आधी वणीत कोणतेच अवैध धंदे नव्हते काय? श्याम ठाणेदारच या सर्व धंद्यांना जबाबदार होते काय? आयजी चा धाडीत ते कसुरवार कसे? अवघ्या 6 ते 7 महिने पदभार सांभाळणारे श्याम सोनटक्के यांचा गेम की नेम असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे….”