
वणी :- येथील जवळच असलेल्या वांजरी येथील लगतं असलेल्या जंगलात मागील ३० वर्षांपासून ८ ते १० पारधी समाजसचे कुटुंब जनावारांपेक्षाही हीन दारिद्र्याचे मानवी जीवन जगत असल्याचे वास्तव वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकाऱ्यांनी आज ता. १२, मार्च रोजी दुपारी ४ वाजता पारखीबेड्यावर भेट देऊन जनामांसाच्या निदर्शनास आणले आहे.
देशाला स्वतंत्र मिळून ७२ वर्ष झालं असले तरी लोकशाहीचा घटक म्हणून मानव हा केंद्रस्थनी आहे. असे असताना देखील लोकशाहीतील पारधी समाज आजही भटकंतीचे जीवन जीव मुठीत घेऊन जगताना दिसत आहे. अशीच एक सत्य परिस्थिती वणी वरून अगदी हाकेच्या अंतरावर आलेल्या वांजरी या गावाजवळ निदर्शनास आले आली आहे. वांजरी गावालगत महाराष्ट्र शासनाचे इ क्लास जागा असून काही भाग जंगली आहे. या जंगली भागात मागील ३० वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातून भटकंती करीत आलेला पारखी समाजाचे ८ ते १० कुटुंब झोपड्या टाकून आपले जीवन जगत आहे. या कुटुंबातील काही सदस्य मिळेल ते काम तर काही वयोवृद्ध महिला भीक माणगुण आपली उपजीविका करीत आहे. या कुटुंबातील कोणत्याही सदस्या कडे आधार कार्ड नाही , मतदान कार्ड नाही, राशनकार्ड नाही, शासनाचा कोणताही पुरावा नाही आणि शेजारी असलेल्या गावातील कोणी मदतीसाठी देखील फिरकत नाही. आचारी,गरिबी, आणि अशिक्षित पणामुळे कोणी त्यांची अवस्था जनावरापेक्षा ही हीन झालेली आहे. माणूस असून अश्या हिनतेचे जगणे हा पारधी समाज जगत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, दिलीप भोयर यांना मिळताच त्यांनी तात्काळ या बेड्याला भेट देण्याचे नियोजित करून शहराध्यक्ष किशोर मुन, कपिल मेश्राम, नासिर शेख, महेश आत्राम, चंदन पळवेकर, खुशबू तेलतुंबडे यांनी पारधी बेड्यावर जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली असता पारधी समाजाचे जगण्याचे वास्तव समोर आणले. यात त्यांच्या बेड्यावर, पाण्याची व्यवस्था नाही, वीज नाही, राहायला छत नाही. प्लास्टिकच्या टाळपत्रीचे छत्र बनवून उडघड्यावर जीवन जगत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अशी भीषण स्थिती आज समोर आली असून यावर तात्काळ प्रशासनाने दाखल घेऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी केली आहे.
सरकार मारत असलेल्या विकासाच्या बढाया फक्त कागदावरच आहे
- दिलीप भोयर
सरकार विकास झाला म्हणून प्रचंड बढाया जरी मारत असलं तरी तो विकास फक्त कागदावरच दिसून येत आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही एखादा समाज जनावरांपेक्षा ही हीन दर्जाचे जीवन जगत असेल आणि तो त्यांच्या मूलभूत सोयी सवलती पासून वंचित असेल तर याला कोणता विकास म्हणावा असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी व्यक्त करत सरकारचा खरपूस समाचार घेतला.
