मारेगाव येथे सजला स्त्री शक्तीचा जागर विविध समजपयोगी कार्येक्रम संपन्न

विविध महिला महापरुषाच्या वेशभूषा वेषात प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेत होते.

मारेगाव :-

मारेगाव येथे विविध सामाजिक संघटनेचे माध्यमातून जागतिक दिना चे औचित्य साधून
“मी जिजाऊ बोलतेय!” एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या
सादरकर्त्या ” महाराणी हिराई” कर्तबगार महिला सन्मान प्राप्त चैताली विजय खटी यांनी सादर केला, येथील सर्व महिला संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १० मार्च नगरपंचायत च्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता, ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका माननीय संगीता हेलोंडे API पाटण (प्रभारी), अध्यक्षा म्हणुन अरुणाताई खंडाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शितल पोटे सभापती प. स. मारेगाव, मायाताई चाटसे API निर्भया पथक वणी, निलिमा काळे वणी, सोबत सर्व नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगरसेविका व इतर पाहुणे मंचवार उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात सर्व पाहुणे मंडळींनी
विचार व्यक्त करताना समाजपयोगी कार्यक्रमातून महिलांना जगण्याची एक नवी दिशा मिळतात व समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन समाजामध्ये महिलांचा मान सन्मान जपण्यासाठी मोठी भूमिका पार पाडतात,असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सुषमाताई काळे, इंदुताई किन्हेकर, ओबीसी महिला कृती समिती तथा माजी नगराध्यक्षा,मारेगाव सोबतच किरणताई देरकर संस्थापिका सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व अध्यक्षा एकविरा महिला अर्बन बँक मारेगाव यांनी ह्या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले सोबतच सर्व विविध सामाजिक संघटना सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन, राष्ट्रीय ओबीसी महिला संघटना, ओबीसी महिला समनव्य समिती, एकविरा बहुद्देशीय पथसंस्था मारेगाव,सखी मंच महिला संघटना, महिला बचत गट, जिजाऊ ब्रिगेड, व इतर महिला संघटना आदींनी सहकार्य केले आहे.