कोना १६ लाभार्थ्यांना दिली व्यसनमुक्तीची शपथना येथे वंचित निराधार व व्यसनमुक्ती शिबीर संपन्न,

वणी :- येथुन जवळच असलेल्या कोणा येथिल जिल्हा परिषद शाळेत काल ता. १५ रोजी दुपारी १२ वाजता वंचित निराधार लोककन्यान अभियानाअंतर्गत ग्रामजयंती पर्वाचा निमित्याने निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती शिबीर संपन्न झाले. यावेळी १६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
श्रीगुरुदेव सेना, वंचित बहुजन आघाडी व निर्मिती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित निराधार लोककल्याण अभियान सुरू करून वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामजयंती पर्व म्हणून गावागावातील निराधारांची सेवा केल्या जात आहे. गावतील जे गोरगरीब गरजू निराधार वयोवृद्ध, विधवा माता बघिणी, दिव्यांग लोक शासनाच्या निराधार योजनेपासून वंचित आहे अश्या निराधारांची निवड करून त्यांचे अर्ज भरून घेतल्या जात आहे. व त्यांना निराधार मिळून देण्यात येत आहे. व ज्यांची निवड करण्यात येत आहे. त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन निर्वेसनी जगण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे आणि गावातील ग्राम पंचायतीचे काम वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना घेऊन सुरू करन्यात यावे साठी ग्राम पंचायतीला तसे निवेदनही देण्यात येत आहे. काल संपन्न झालेल्या शिबिराला मार्गदर्शक म्हणून श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचितचे तालुकाध्यक्ष व निर्मिती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिलीप भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग कोना ग्राम पंचायतीच्या सरपंच्या सौ. रंजनाताई खमनकार, उपसरपंच विजय परचाके, सुभाष परचाके यादी मान्यवर उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते विनोद आत्राम, रंजना तोडसाम, वंचितचे, राजकुमार पेटकर, गणेश बोधाने यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व लाभार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन राष्ट्रवंदनेने शिबिराची सांगता करण्यात आली.