रविनगर येथे एकाच रात्री पाच घरफोड्या , बंद घरांवर चोरट्यांची नजर

  • Post author:
  • Post category:वणी

वणी : नितेश ताजणे

शहरातील रवी नगर येथे एकाच रात्री तब्बल पाच ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यातील मिलिंद वटे यांचे घरातून २ हजार दोनशे रुपये नगदी कलदार चोरट्यांनी चोरून नेले तर रमेश एलट्टीवार यांचे घरातून चांदीचे काही शिक्के चोरीला गेले असुन प्रदीप बोढेकर , गंगारेड्डी एलट्टीवार व मधुकर मुके यांचे घरातून चोरांना काहीही मिळाले नाही.
फिर्यादी तुलसीदास उर्फ मिलिंद विठ्ठलराव वटे (५३) रा. रविनगर यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी अद्ण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पाचही मकान मालक बाहेर गावी असल्याने दरवाज्याला कुलूप लागले होते, अशा कुलूपबंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष केले आहे.
बुधवारी दि.६ ऑक्टोंबर ला सकाळी ५:४५ वाजता अरविंद वटे यांनी त्यांचे भाऊ मिलींद वटे यांना फोनवरून माहिती दिली की, त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असुन घरातील सामान अस्ताव्यस्त पडून आहे. मिलींद वटे यांना चोरी झाल्याची कल्पना आल्यानंतर ते त्वरित वणीला आले व घराची पाहणी केली. त्यानंतर ८:३० वाजताचे दरम्यान मिलिंद वटे यांनी शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकार यांना फोन वरून माहिती दिली असता ते प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के ठाणेदार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. ठाणेदारांनी घटनेचे गांभीर्य घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले.
पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचल्यानंतर सिव्हिटीव्ही फुटेज ,फिंगर प्रिंट्स घेऊन तपास करीत होते. सद्या सर्वत्र घरफोडीच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसुन येत असुन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन पोलीसांसमेर निर्माण झाले आहे.