शिवमहोत्सव समिती खांदला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न

  • Post author:
  • Post category:वणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न पडण्यापेक्षा, त्यांनी केलेल्या त्यागमय जीवनावर प्रश्न पडले पाहिजेत कि ते जाणते राजे कसे झाले आले: संजय देरकर

वणी (खांदला) शिवमहोत्सव समिती खांदल्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती ला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा संजय देरकर उपाध्यक्ष जिल्हा माध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ
प्रमुख व्याख्याते म्हणून
खंडू पाटिल डोईफोडे (बार्शी )सातारा म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डाँ जगन जुनघरी, भगवान मोहिते, निलेश पिंपळकर सरपंच कोलगाव, राजेंद्र ईद्दे सामाजिक कार्यकर्ते, गणेश जणेकर सरपंच साखरा, जगदीश बोरपे सरपंच शिरपूर, प्रफुल बोथाडे उपसरपंच खांदला, संतोष वासेकर पोलीस पाटील खांदला, शालिकराव पत्रकार तंटा मुक्ती अध्यक्ष खांदला, गणेश जुमनाके ग्रा प सदस्य, सुनीता आसूटकर ग्रा. सदस्य, वर्षाताई पावडे ग्रा. सदस्य, सुप्रिया गौरकर ग्रा प सदस्या, हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते ह्यावेळी सर्व पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दीप प्रज्वलन व हरार्पण करून अभिवादन केले नंतर कार्यक्रमांची सुरवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली ह्यावेळी पाहुण्यांचा हस्ते गावातील 10 वि 12 वि गुणवंत विध्यार्थ्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर डाहुले, तर कोमल लखमापूरे तर आभार पंकज ठावरी यांनी केले ह्या शिव महोत्सव समिती चे सर्वे सर्वा हेमंत गौरकर सरपंच खांदला यांनी व मित्रपरिवारांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले,,