
ऑनलाइन भरलेल्या वीज बीलामध्ये 3 हजार ९०० चा डल्ला
वीज ग्राहकांची लूट
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलात जास्त पैसे लावून बिळातील जास्तीचे पैसे चोरी करून महावितरण कर्मचाऱ्याच्या घशात जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.
खापरी येथील तुळशीराम शामराव मडावी हे ७ एप्रिल रोजी झरी येथील महावितरण कार्यालयात ७७ हजार ४३० रुवयाचे बिल घेऊन गेला होता. बिल जास्त आल्याने सदर बिल दुरुस्त करून कमी करून मागितले. कार्यालयातून बिल कमी करून १६ हजार ७० रुपयेचे बिल देण्यात आले. मडावी यांनी १६ हजार ७० रुपयाचा बिल त्याच कार्यालयात भरून दिले. काही दिवसानंतर भरलेला बिल ऑनलाइन मडावी यांनी चेक केले असता वीज बिल १२ हजार ८० भरल्याचे दिसले. मग ३ हजात ९९९ रुपये गेले कुठे ? असा संतप्त प्रश्न उवस्थित करून समाजिक कार्यकर्ते कालिदास अरके यांनी झरी येथील महावीतरचे कार्यालय गाठून तिथे उपस्थित असलेले इंगोले नामक बाबूला विचारणा की असता ३ हजार ९९० रुपये व्याज आल्याचे सांगितले. व व्याजाचे पैसे ऑनलाइन दिसत नाही असे सांगूनसदर ग्राहकांची दिशाभुल केली. तरी ३ हजार ९९० गेले कुठे किंवा कुणाच्या घशात गेले त्याचा शोध घेवून त्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा समाणिक कार्यकर्ते कालिदास अरके यांनी दिला आहे.
