
चिखलगाव ओमनगर नागरीकांना
येता जाता रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वारंवार फोन करून तक्रारी केल्या अर्ज देऊन सुद्धा तक्रार केली मात्र ग्राम पंचायत त्या त्रासाला काहीच लक्ष देण्यास तयार नाही ग्रामपंचायत फक्त कर वसुली करण्यात अव्वल नंबर घेऊन आपले व ग्रामपंचायत चा सत्कार करून घेन्याच्या मार्गावर आहे.का असे मत ओमनगर परीसरातील नागरीक करीत आहे.त्यानी ह्या पंचवार्षिक मधे केवळ आय एस ओ ग्रामपंचायत चे बोर्ड लावून लोकांची दिशाभूल करण्याचे काम करून दाखवल्याचे
एकंदरीत दिसत आहे.
मागील वीस वर्षे पर्यंत विकास रखडला नव्हता जेव्हा सुनिल कातकडे सरपंचपदाचा कारभार सांभाळत होते मात्र आता ग्रामपंचायत पॅनल सुनील भाऊ कातकडे यांच्या हातात असताना देखील शासनाच्या नियमाने आरक्षण एस टी आल्याने भाऊना अनिल पेन्दोर याच्या हातात सरपंचपद द्यावे लागले. वाशीयाना नाहक त्रास.सहन करावा लागत असल्याने आता येणारी ग्रामपंचायत निवडणूक क हाती येणार का असे हि नागरीकांमध्ये चर्चा सुरु आहेत.
