आता शिवसेना उतरली कोविड रुग्णाच्या सेवेत…,रुग्णवाहिका,ऑक्सिजन ची सुविधा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी:. नितेश ताजणे,वणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनतेच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गावागावात घरोघरी रुग्ण आढळुन येत आहेत. सामान्य रुग्णांना न परवडणाऱ्या वैद्यकिय सेवा घेऊ शकत नाही. त्यामुळे जनता चांगलीच त्रस्त होतांना दिसत आहे. हि बाब लक्षात घेऊन आता शिवसेना नागरीकांच्या स़ेवेत उतरली आहे.
शहरासह, वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी शिवसेना वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे यांनी रुग्णसेवेत दोन ऑक्सिजन अँबुलन्स उपलब्ध करून दिल्या, वणी ट्रामा केअर कोविड केंद्रात रुग्णाच्या सोयीसाठी सर्व हॉल मध्ये एक्झॉस पंखे लावून दिले, ऑक्सिजन सिलेंडर सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर तर्फे शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करणे सुरू आहे. युवा सेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांचे माध्यमातून कोविड रुग्णांसाठी घरपोच ऑक्सिजन सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन युक्त अँबुलन्स, कोविड रुग्णांच्या घरी सॅनिटायझर फवारणी, रुग्णांच्या प्लाज्मा संदर्भात कोणत्याही माहिती साठी मदत हवी असल्यास सहायता क्रमांक आहे अजिंक्य शेंडे 9096358002 युवासेना उपजिल्हाधिकारी ,
मंगल भोंगळे 9822151729 जैन लेआऊट , महेश पहापळे 7020454229 ,ललित लांजेवार 9923110411,जनार्दन थेटे 9922548109,मुन्ना बोथरा 8007850100,अंकुश पडाल 8262070367 तर कुठल्याही रुग्णाला एम्बुलेंस ची गरज पडल्यास त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर अँबुलन्स ड्रायव्हर अमर आत्राम – 935613 1730 , केतन सोयाम 9834553187 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन शिवेनेच्या वतीने करण्यात आले आहे.