गोठ्याला आग लागून गोठा खाक,शेतकऱ्याचे १लाखाचे नुकसान

वणी तालुक्यांतील कायर येथे अमृत पॅटर्न पऱ्हाटी लागवटीसाठी परिचित असणारा युवा शेतकरी सुनिल देवेंद्र बोगुलवार यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेतलगत असलेला शेतकरी बालाजी पोषट्टी सकिनलावर हा आपल्या शेतातील उलंगवाटी झालेल्या पऱ्हाटीला जाळून नष्ट करीत होता तेंव्हा त्याने आपल्या शेतात लावलेली आग विझवून घराकडे न जाता जळत असलेल्या पऱ्हाटीला जळतच सोडून तो घराकडे निघून गेला

त्यामुळे ती आग लगत असलेल्या सुनिल देवेंद्र बोगुलवार यांच्या शेतात पेटत जावून आणि ती आग गोठ्याला लागून गोठा नष्ट झाल्याची घटना दिनांक २० मार्च २०२२ रोजी घडली आहे तेव्हां बोगुलवार यांच्या शेतात कोणीच नसुन शेतालगतील बंडू टोंगे यांनी भ्रमणध्वनीद्वारे गोठ्याला आग लागली असल्याची माहिती दिली

त्यावेळेस बोगुलवार यांनी शेतात जावून पाहिले असता
त्या आगीत ८ स्प्रिक्लर ३ बॅग डीएपी ३बॅग १०.२६.२६ २बॅग पोटॅश १ बॅग १८.१८.१० २बॅग१२.३२.१३ २बॅग सुपर फॉस्फेट ३बॅग सल्फर १० किलोग्रॅम वाल्या सक्षम कंपनीची झटका मशीन सोलर सर्विस केबल ३५० फूट फवारणीचे चार्जिंग पंप चना आणि सोयाबीन फवारणीचे आशाटॉप १५ बाय १८ ची ताळपत्री तसेच शेती उपयोगी नागरण आणि वकरणाचे साहित्य गोठ्यावरील टिना या आगीत जळून नष्ट झाल्याचे त्यांना आढळुन आले
तरी आग लावणारा बालाजी पोषटी सकिनलावार याच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिरपुर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केली आहे