घरी लग्ण असल्याणे विद्युत खांब हटवण्यास विलंब?,दरम्यान अपघात घडल्यास कोन जबाबदार ? नारायन गोडे यांचा सवाल

  • Post author:
  • Post category:वणी

वणी-यवतमाळ मार्गावरील साई मंदिर ते चिखलगाव रेल्वे फाटकापर्यत सिमेंट रस्त्याच्या कामाला गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान रस्त्याच्या मधोमध असलेले विधुत खांब अपघातास निमंत्रण देत आहे. यात अनेक अपघात सुद्धा घडले आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने खांब काढण्यासाठी रक्कम सुद्धा अदा केल्याची माहिती आहे.
सर्व प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता म्हणे कंत्राटदाराच्या घरी लग्ण असल्यामुळे रस्यावरील विधुत खांब हटवण्यास विलंब होत आहे. याबाब सामाजीक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता यांना दुरध्वनी वरुन संपर्क केला असता सदर माहिती दिल्याचे नारायण गोडे यांनी सांगितले आहे.
मात्र कंत्राटदाराच्या घरी लग्न असल्यामुळे जर विधुत खांब हटविण्यास विलंब होत असेल आणि दरम्यान एखादा अपघात घडल्यास कोनाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न सामाजीक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी उपस्थित केला आहे.