व्यसनमुक्तीतच मानवाचे कल्याण आहे, दिलीप भोयर ६ गावातील २२ लोकांच्या निराधारांना मान्यता


वणी :- मानव जातीला दारू,खर्रा, तंबाकू,बिडी सारख्या व्यसनाने पूर्णतः ग्रासल्याने गोर गरीब लोक आर्थिकदृष्ट्या बरबाद होत आहे. मोल मजुरी करा आणि सर्व पैसे व्यसन करण्यात उडवून द्या अश्या वाईट सवयी मुळे मानवी जीवनाच मूल्य कमी होत आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीतच मानवाचे कल्याण आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी आज ६ गावातील २२ लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला असता त्यांचे समारोप घेताना आज ता. ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शेतकरी तक्रार निवारण केंद्रा समोर व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून दिलीप भोयर यांचे मार्गदर्शनाखाली मागील तीन महिन्यापासून एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शन शिबिर गावोगावी घेऊन गोर गरीब, वयोवृद्ध, विधवा महिला व दिव्यांग असलेल्या वंचित निराधारांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांना जागृत करून त्यांची निवड करण्यात येते व त्याच ठिकाणी त्यांचे अर्ज भरून पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या जाते. त्यामुळे निराधारांना निराधार योजनेचा लाभ घेणे अत्यंत सुलभ झाले आहे. एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमांतर्गत आमलोन व ढाकोरी येथील शिबिरात , देऊरवाडा,निंबाळा, बोरी, व नायगाव येथील लाभार्त्याना आज एकूण २२ जणांना निराधार योजनेचा लाच मिळवून देण्यात आला. व सर्वांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम सांगून वेसनमुक्तीची शपथ दिली व राष्ट्रावंदना घेऊन लोकांना आपआपल्या गावी रवाना केले. यावेळी दिलीप भोयर, वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग,शहराध्यक्ष किशोर मुन, ढाकोरीचे सरपंच अजय कवरासे, आमलोन येथील सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ धगळी, सुभाष परचाके, पुंडलिक मोहितकार आदी उपस्थित होते.