

राष्ट्रवादीचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा अटकेच्या निषेधार्थ वणीत आंदोलन
वणी दि 23-2,2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे नेते नवाब मलिक यांना ईडी कडून अटक करण्यात आली त्याचेच पडसाद वणी मध्ये पहायला मिळाले, वणी विभागातील युवकाच्या पुढाकारातून ईडी च्या अधिकाऱ्यांना बांगड्या चे डब्बे पोस्टा मार्फत यांचा अर्थ मंत्री भारत सरकार यांना पाठवुन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. भारत सरकार चा वित्त विभागाच्या अधीनीस्त असलेली संस्था अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) यांनी राजकीय द्वेषा पोटी नवाब मलिक यांचा वर अटकेची कार्यवाही केलेली आहे. हि कार्यवाही लोकशाही साठी घातक आहे, ईडी तील सनदी अधिकारी हे केन्द्र सरकार चे बाहुले झालेले आहे, आज पर्यंतच्या इतिहासा मध्ये अश्या कार्यवाही कधीच झालेली नाही.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्या करीता केन्द्र सरकार ई.डी ला हाताशी धरुन राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे काम मोदी सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला आहे.
पोस्टामार्फत बांगड्या चे डब्बे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सुर्यकांत खाडे,विजय नगराळे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, गुणवंत टोंगे,रामकृष्ण वैद्य,वैशाली तायडे,नागभीडकर,प्रणय बल्की, बंटी प्रेमकुंटावार, सचिन वालदे, जयस्वाल,सचीन चव्हाण,प्रणय बल्की,अनिकेत थेरे, समीर भादंकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
