मुकुटबन परिसरात दारूची अवैध विक्री तेजीत, एकावर कारवाई

  • Post author:
  • Post category:वणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत
येणाऱ्या आडेगाव ,परसोडी कोसारा, मार्किंबुजरूक, गणेशपुर, खातेरा यां परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची होत आहे। त्यामुळे येथील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र दारू विक्रेत्यांच्या दादागिरी मुळे तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही
.

मुकूटबन पोलीस ठाण्या अंतर्गत आडेगाव ,मार्किं, खातेरा , गणेशपुरे ही मोठी आहे। या ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध दारूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. या विक्रेत्याकडून पोलीस विभागातील काही कर्मचारी हाताशी धरून व्यवसाय केल्या जात आहे। त्यासाठी चिरीमिरीच्या मार्गाचा अवलंब ही केल्या जात असल्याची चर्चा आहे। मात्र त्याकडे पोलीस विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरी कडे जे व्यावसायिक आर्थिक मार्गाचा अवलंब न करता व्यवसाय करतात त्यांना पोलीसी कारवाईचा सामना करावा लागत आहे। बहुतांश जण मुकूटबन मधील एका दारू व्यवसायिकडू पेट्या विकत घेतात आणि गावोगावी पोहचवून देतात. मुकूटबन मधुन हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सर्व सामान्य नागरिकांना माहीत असतांना पोलीस विभागाला ती माहिती नसावी या बाबत शंका व्यक्त केल्या जात आहे.
पोलिसांना एका निषेध गुप्त हेरकडून मिळालेल्या माहिती च्या आधारे शिंधिवाढोना ते कोसारा मार्गावरून येणाऱ्या एका पल्सर दुचाकीला पकडून झडती घेतली तेव्हा वाहनधारक कडे ९० मिलीचे ५० बाटल्या , ज्याची किंमत अंदाजे 1500 रु आहे. या प्रकरणी गणराज सूर्यकांत पोटे याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई नंतर पोलिसांनी स्वतः ची पाट थोपटून घेतली। तसे पाहता पोलिसांनी केलेली ही कारवाई अभिनंदनियच आहे। मात्र ज्या ठिकाणी हा दारूचा अवैध व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहे। त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। शिवाय मुकूटबन मधील ज्या दारू वलय कडून घरपोच पेट्या दिल्या जातात . त्याचा शोध घेऊन कारवाई होणे अपेक्षित आहे.मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे मुकूटबन पोलीस संशयाच्या घेऱ्यात सापडले.