मारेगाव तालुक्याचे सालेभट्टी वरूड येथील ग्रामस्थाचा निवेदनातून इशारा

प्रतिनिधी : नितेश ताजने -वणी
अज्ञानी आणी अशीक्षीत जनतेची नाळ ओळखलेल्या भ्रष्ट यंत्रनेकडुन, शासनाच्या विविध जनविकास योजनांचे नावावर, ग्रामविकासासाठी आलेल्या लाखो रुपयाला चुना लावत, स्वत:चे खिशे भरणा-या भ्रष्ट ग्रामपंचायत प्रशासन, ठेकेदार, सचिव आणी वरिष्ट अधीकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करा, आन्यथा तिव्र स्वरुपाचे जनआंदोलन उभारु असा इशारा, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर महाराज लोनसावळे यांचेसह ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मारेगाव तालुक्यातील वरूड-सालेभट्टी ही गट ग्रामपंचायत आदिवासी बहुल क्षेत्रात मोडणारी गट ग्रामपंचायत आहे. वरुड-सालेभट्टी व वरुड-तांडा अशा वेगवेगळ्या गाववस्त्यांनी मिळून निर्माण झालेल्या या गट ग्रामपंचायतीच्या गाव विकासासाठी शासनाकडून आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी आला. तो कागदोपत्री थातुरमातुर कामे दाखवुन खर्चही केल्या गेला. प्रत्यक्षात मात्र, गावविकास झालाच नाही. आणि जो काही विकास झालाय तो केवळ आणि केवळ विषयात नमुद भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकारी यांचाच आर्थिक विकास झाल्याचे दिसते आहे. याबाबत अनेकदा पंचायत समिती प्रशासनाकडे तोंडी वजा लेखी निवेदने दिलीत. मात्र, संबंधीतावर कुठलीच आजपर्यंत कार्यवाही झाली नाही. असा घनाघाती आरोप निवेदनकर्त्यांनी पंचायत समिती प्रशासनावर निवेदनातुन केला.
दिलेल्या निवेदनात, १ एप्रिल २०१६-१७ ते जुलै २०२१-२२ या कालावधीत शासनाच्या
ग्रामविकासाच्या धोरणात्मक निर्णयातील वेगवेगळ्या विकासात्मक योजनांपैकी… रोजगार हमी योजनेसह आदिवासी उपाययोजना कार्यक्रम, दलितवस्ती-तांडावस्ती, पेसा योजना, १४ वित्त आयोग योजनासह ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत वरुड-सालेभट्टी या गटग्रामपंचायत क्षेत्रात लाखो रुपयाची विविध विकास कामे झालीत. यात, सिमेंट नाली बांधकाम, सिमेंट रस्ता बांधकाम, स्मशानभुमी सौंदर्यीकरण व शेड बांधकाम, सार्वजनिक व व्यक्तीगत शौचालय बांधकाम यासह पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या नळयोजनेचे बांधकामे देखील करण्यात आले. मात्र झालेली वरील सर्व कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून थातुरमातुर स्वरुपाची केल्या गेली. यापैकी तर बरीचशी कामे ही अर्धवट स्वरुपात केल्या गेली. असाही गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला.
इतकेच काय तर, कामाच्या निकृष्ट दर्जामुळे झालेली कामे आज रोजी कुठे आहेत ? हा सर्वांनाच पडलेला प्रश्नही आंदोलकांनी निवेदनातून उपस्थीत केला व झालेल्या सर्व कामाची बिले काढल्या गेली, असाही घनाघाती आरोप केला.
भ्रष्ट कामाचा निवेदनातून पाढा वाचत असतांना, गावातील अनेक शौचालय बांधकाम लाभार्थ्याचे पैसे देखील काढून घेतल्या गेले व योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळालाच नाही. असाही गंभीर आरोप आंदोलकाचा आहे.
या सर्व बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराला ग्रामपंचायत प्रशासनासह वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि ठेकेदार हे प्रत्यक्ष जबाबदार आहे. असा आरोप आंदोलकांनी निवेदनातून केला आहे.
निवेदनातील नमुद सर्व भ्रष्ट कामाची चौकशी व्हावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा यासाठी अनेकदा तोंडी बजा लेखी अर्ज विनंत्या केल्यात. मात्र भ्रष्ट लोकांना वाचविण्यासाठीचेच काम आज रोजी पर्यंत तरी दिसते आहेत. असा गंभिर आरोप आंदोलकाचा पंचायत समिती प्रशासनावर आहे. म्हणूनच ग्रामस्थांना न्याय मिळावा यासाठी गंगाधर फकरुजी लोणसावळे महाराज रा. सालेभट्टी ग्रामवासीयाच्या पुढाकाराने ग्रामवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्ट अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासन आणि ठेकेदारावर कायदेशिर कार्यवाही व्हावी या बरोबरच अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी. या एकमुखी मागणीसाठी दि. २३/०८/२०२१ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसत असल्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.
शेवटी या न्यायप्रिय लढ्यात काही विपरीत घटना वा जिवितहानी झाल्यास पंचायत समिती प्रशासन यास जबाबदार राहिल असा गर्भित इशारा देखील आंदोलक ग्रामस्थांनी निवेद्नातून दिला आहे.
आता तरी पंचायत समिती प्रशासनाला जाग येईल का ? आणी आंदोलकांना न्याय मिळेल का ? हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी मात्र, मागील अर्धदशकापासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत असलेल्या मारेगाव तालुक्याचे वरुड सालेभट्टी ही गट ग्रामपंचायत, यावेळी ग्रामस्थानी दिलेल्या जनआंदोलनाचे इशा-यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे विशेष…
