प्रकाश दामाजी मडचापे(४२) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असुन वडजापूर पो.मेंढ़ोली ता.वणी येथील मूळ गाव असलेले प्रकाश मडचापे हे वरोरा जी.चंद्रपुर येथे एस.टी.महामंडळ येथील एस.टी.चालक पदावर कार्यरत होते.आपले कर्तव्य बजावून माधव नगर मारेगाव येथे वास्तव्यात असलेल्या निवासी मोटरसायकल क्रमांक एम.एच.३४ ८६८२ ने परत येत असतांना राज्य महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक क्रं.एम.एच.४०बी.जी.६५०९ ला मागावुन जबर धडक दिली.यात त्यांचा करुन अंत झाला.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा आप्तपरिवार आहे.