
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
बोगस बियाणे आसमानी व सुलतानी संकटाने यावर्षी शेतकऱ्याला पहिलेच दुबार , तिबार पेरणी करायाव्या लागल्या आहे एवढे सारे दुःख असताना वीज पडून बैल मृत्यू पावल्याने शेतकऱ्यांचा दुःखात भर झाली आहे
मारेगाव: विजेच्या वा-यासह पाऊसाने मारेगाव तालुक्यातील इंदिराग्राम (बंदरपोड) येथील शेतकरी वसुदेव गणपत आत्राम यांच्या शेतातील डवरणीचे काम चालू असताना सायंकाळी ५ वाजतच्या सुमार पाऊसा सह अचानक विज पडल्याने झाडा खाली बांधलेल्या दोन बैलावर विज पडल्याने दोन बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
इंदिराग्राम (बंदरपोड )येथील नुकसानग्रस्त शेतकरी वासुदेव गणपत आत्राम यांचे दोन बैल विज पडुन ठार झाल्याने शेतकऱ्याला प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.
