धक्कादायक… ग्रामीण रुग्णालयाचा आणखी एक ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, तो अनोळखी मृतदेह रुग्णाचा चिठ्ठी वर अर्धवट माहिती नमुद केल्याने शोध लावण्यास अडचण


वणी . नितेश ताजणे

दि.१६ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता चे सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात एक ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरुण झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दरम्याण परिसरातील काही लोकांनी त्याला ग्रामिण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.याची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली होती.त्यावरुन पोलिसांनी त्या मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत मात्र दोन दिवस उलटूनही त्या मृत तरुणाची ओळख पटविण्यात यश आले नाही. या दरम्यान धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. तो मृतक तरुण हा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दि. १६ एप्रिल रोजी आला होता. त्याने प्रथम उपचारासाठी १० रुपयाची काढली त्या चिठ्ठीत प्रकाश बुद्धाजी खंडारे रा.वणी असे नमूद असून प्रकाश ति चिठ्ठी घेऊन डॉक्टरांकडे जाऊन आपल्या प्रकृतीची तपासणी करून घेतली व औषधोपचार लिहून तो तरुण रुग्णालया बाहेर पडला. त्या तरुणाची प्रकृती एवढी गंभीर होती की तो तरुण रुग्णालया परिसरातच थांबला व काही वेळाने तो चक्कर येऊन पडला असता तेथील उपस्थित काही लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेची “ती” चिठ्ठी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांच्या हाती लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असुन त्या चिठ्ठी वर सदर रुग्णाचा संपुर्ण पत्ता लिहीला असता, तर त्या मृत रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेणे सोपे झाले असते असेही सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयांत चिठ्ठी देण्याची जबाबदारी वार्डबाय असलेल्या कर्मचा-याकडे देण्यांत आली असून हा कर्मचारी जाणीवपुर्वक चिठ्ठीवर कोणत्याही रुग्णाचा पुर्ण पत्ता लिहीत नाही. यासाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी केला आहे.