
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, झरी
दि.18/07/2021 रोजी शिवसंपर्क अभियान जिल्हा परिषद सर्कल मुकूटबन पाटण येथे राबविण्यात आले. हे अभियान कृ.ऊ.बा.समिती हॉल मुकुटबन येथे घेण्यात आले.त्यावेळी उदघाटक म्हणून माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख मा.श्री.विश्वास भाऊ नांदेकर आणि कार्यक्रमा चे अध्यक्ष युवा सेना जिल्हा प्रमुख मा.विक्रांत चचडा आणि शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल पंचायत समिती सदस्या सौ.प्रणीता ताई घुगुल कृ.ऊ.बा.समिती चे उप सभापती संदीप विंचू युवा सेना तालुका प्रमुख पवन राऊत युवा सेना तालुका संघटक निलेश बेलेकार शिवसेना महीला आघाडी उप तालुका प्रमुख सौ.उषाताई ढवस, शिवसेना उप तालुका प्रमुख सिताराम पिंगे निलेश चौधरी युवा सेना विभाग प्रमुख चेतन बाशेट्टीवार सरपंच विशाल ठाकरे उप सरपंच हरिदास सुरपाम राजू लोडे उपस्थित होते.त्यावेळी जिल्हा परिषद मुकुटबन पाटण सर्कल येथील 35 युवकांनी पक्ष प्रवेश केले. त्यामुळे आता झरी जामणी तालुक्यात युवासेने ची ताकत वाढतांना दिसत आहे.
