शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला वणी शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला

  • Post author:
  • Post category:वणी

प्रतिनिधी:शुभम मिश्रा ,वणी

वणीतील छ. शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला.वणी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अधिकाधिक व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेऊन लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान शहरातून मोर्चाही काढण्यात आला.या मोर्चाला मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि वणीकरांनी सहभाग घेतला होता.तसेच हा मोर्चा खाती चौक, दीपक चौपाटी, सर्वोदय चौक, टागोर चौक, गांधी चौक, जटाशंकर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमन करीत याची सांगता छ. शिवाजी महाराज चौक इथे करण्यात आली. मोर्चामध्ये व्यापा-यांना व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चा संपल्यावर मान्यवरांनी भाषण करीत आपली
आपली मत मांडली.मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.