प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी

आज दिनांक 24/06/2021 गेला अनेक दिवसांपासून कायर परिसरातील जनतेची रुग्णवाहिकेची मागणी होती त्या मागणीला अनुसरून वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्य दक्ष आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब जि. प. सदस्याचे सौ. मंगलाताई पावडे पंचायत समिती माजी सभापती व प. स. सदस्या सौ. लिशाताई विधाते यांच्या पाठपुराव्याने सदर रुग्णवाहिका मंजूर झाली व आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला तरी कायर परिसरातील नागरिकांनी या रुग्ण वाहिकेचा लाभ घ्यावा. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित भाजपा चे जेष्ठ नेते दिनकररावजी पावडे भाजपा तालुकाध्यक्ष गजानन भाऊ विधाते जि. प. सदस्य बंडू चांदेकर जि. प. सदस्य परसरामजी पेंदोर सरपंच नितीन दखणे युवामोर्चा तालुकाध्यक्ष शुभम भाऊ गोरे सोनु बोथले कायर चे माजी सरपंच रामजी गोंडलावार माजी पोलिस पाटील महेश पा. देशमुख याक़ूब पठाण टिंकू भदौरिया शिवराज माहकुलकर डॉ. वरारकर प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथील डॉ. शेंडे साहेब व येडमे मॅडम सर्व कर्मचारी व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व गावकरी उपस्थीत होते. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याबद्दल कायर परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.