भाऊसुनेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भासऱ्याला अटक ,नात्याला काळिमा

  • Post author:
  • Post category:वणी

वणी तालुक्यातील राजूर (कॉ) येथील विवाहित महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेच्या नात्यातीलच व्यक्तीला महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. पतीच्या गैर हजेरीत आरोपीने तिच्या घरी जाऊन तिला धमकावुन जबरदस्ती तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर आरोपी हा महिलेचा पती घरी नसतांना सतत तिच्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरी करू लागला. असे या पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत महिला व तिचे शारिरीक शोषण करणारा आरोपी राजुर (कॉ) येथे एकमेकांच्या घराशेजारीच राहतात. आरोपी हा नात्यात महिलेचा भासरा लागतो. लहान भाऊ घरी नसताना तो दारू पिऊन त्याच्या घरी जायचा व एकटी राहणाऱ्या भावसुनेला धमकावायचा. 29 नोव्हेंबर 2020 ला लहान भाऊ घरी नसल्याची संधी साधून त्याने घरी एकटी असलेल्या भावसुनेवर अतिप्रसंग केला. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यांतर आरोपी हा लहान भाऊ घरी नसतांना नेहमी दारू पिऊन त्याच्या घरी जायचा व पिडीतेला धमकावुन, मारहाण करुन तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबध प्रस्थापीत करायचा. जवळपास एक वर्षापासून तो शारिरीक शोषण करित असल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे. 7 ऑक्टोबर 2021 ला आरोपीने पिडीतेला जबर मारहाण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचर केला. वारंवारच्या जबरी अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिलेने अखेर हवसेने पिसाळलेल्या आपल्या भासऱ्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ आरोपी राजेंद्र बाबूलाल केवट (40) याला अटक करून त्याच्या विरुध्द भादंवी च्या कलम 376(2)N, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपिआय शिवाजी टिपूर्णे करित आहे.