
वणी : नितेश ताजणे
शिवसेना शहर प्रमुख,लोकवाणी न्युज पोर्टल चे मुख्य संपादक व सामाजिक कार्यकर्ते राजु तुराणकर यांचा जन्मदिवस जनहितार्थ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
गुरुवारी सकाळी बाजीराव महाराज वृद्धाश्रमात वृद्धांना फळे ,बिस्किटे व चिवडा देऊन संध्याकाळी भोजन व्यवस्था करण्यात आली.
त्यानंतर शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेता यावे, विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक भान जपण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी, यासाठी वणी येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिका येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विध्यार्थ्यांना’ पुस्तके भेट देण्यात आले.तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी दिलेली आर्थिक मदत विद्यार्थ्यांना सुपुर्द करण्यात आली.
यावेळी सुनील कातकडे शिवसेना वणी विधानसभा संघटक, मंगल भोंगळे विभाग प्रमुख ,जनार्दन थेटे शाखा प्रमुख यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांबरोबर सामूहिक पद्धतीने राजु तुराणकर यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा साठी लागणारी सर्व तयारी या विद्यार्थ्यांनी केली असल्याने त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवस्थापनाचे धडेही मिळत असल्याची पुस्तीही कातकडे यांनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केली.
