वणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनसोबत माजी आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी साधला संवाद लोकांसाठीच काम करा, लोक तुम्हाला मोठे करणार प्रा राजू तोडसाम यांनी दिली कार्यकर्त्यांना ग्वाही

  • Post author:
  • Post category:वणी


वणी येथे काल दि.27 ला सायंकाळी विदर्भातील जिल्हय़ाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदीवासी सेल चे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी वणी येथील कार्यकर्त्यांची विश्राम गृहामध्ये भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना काम कसे करायचे आहे यांची रुपरेषा समजावुन सांगीतली. पक्षाचा कार्यकर्त्यांनी फक्त लोकांपर्यंत जाऊन त्यांची अडचणी समजुन घ्या आणी त्या लोकांचे काम पुर्ण करुन द्या, तेच लोक तुम्हाला मोठे करणार आहे, मोठे असलेल्या लोका पेक्षा सर्व सामान्य लोकांना पदे द्या, जबाबदारी घ्यायची व पक्षाच्या धोरणात्मक संघटन बांधणी कडे जास्तीत जास्त लक्ष घाला व येणा-या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार आणि नगर पालिका, जिल्हा परिषद साठी आपण सर्वानी आतापासून कंबर कसायची आहे, प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करा, पक्षाकडुन पाहीजे ती मदत आपणास मिळणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत बोलताना सांगीतले, काम करत असताना काही अडचण आली तर मी आपल्या सोबत आहे, तसेच जिल्हय़ाचे नेते, मा.संदीप भाऊ बाजोरीया साहेब, आमदार नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आहे. आणि काम करणा-या कार्यकर्त्यांसोबत पक्ष खंबीर पणे उभा रहाणार अशी ग्वाही प्रा.तोडसाम यांनी दिली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी वणी विभागातील काही मुद्यांवर चर्चा केली. त्यांचासोबत महेश पीदुरकर, कपील कुंटलवार, अक्षय चन्ने, हेमंत गावंडे युवक तालुकाध्यक्ष , मनोज वाकटी शहराध्यक्ष युवक, रामकृष्ण वैद्य, इमदास पकाले, वैशाली तायडे, संदेश तिखट, प्रणय बल्की, सचीन चव्हाण,रानु तुमराम,हार्दिक उरकुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.