नगरपंचायत निवडणूक संमिश्र कौल. राजकीय पुढाऱ्यांना आत्मपरिक्षणाची गरज

  • Post author:
  • Post category:वणी

दिग्गजांना नाकारत सर्व समीकरणे तोडत लागले निकाल. निकाल पाहून काहींची तोंडात बोटे. एका मतांना झाला पराभव.
नितेश ताजणे .वणी
मारेगाव नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून मतदार राजांनी कुणालाही स्पष्ट बहुमत न देता काँग्रेस ला पाच , सेना- भाजपला प्रत्येकी चार , मनसेला दोन , राष्ट्रवादी एक तर अपक्ष एक असे .वंचित शहर विकास आघाडीला खाते उघडता आले नाही हे मात्र विशेष आहे.मनसे ने दोन नगरसेवक निवडणून आणुन प्रथमच नगरपंचायत मध्ये आपला पाया रोवला.

आज लागलेल्या निकालात प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसच्या अनिता नत्थु परचाके (११५) , दोन मध्ये सेनेच्या माला गोकुळदास बदकी (१५७), तीन मध्ये अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर (१०५), चार मध्ये मनसे च्या शेख अंजुम शेख नबी (८२),पाच मध्ये सेनेच्या वर्षा किशोर किंगरे (१७३) , सहा मध्ये भाजप च्या सौ. हर्षा महाकुलकार (१९८); सात मध्ये काँग्रेसच्या छाया किनाके (१००) ; आठ मध्ये भाजप चे वैभव पवार (७८); नऊ मध्ये सेनेचे मनीष मस्की (१३८ ) ; दहा मध्ये काँग्रेस च्या सुनीता किन्हेकर (१११) ; अकरा मध्ये काँग्रेसच्या थारांगना खालिद पटेल (१४४); बारा मध्ये राष्ट्रवादी चे हेमंत नरांजे (९४); तेरा मध्ये मनसे चे अनिल गेडाम (७०), चौदा मध्ये काँग्रेसचे आकाश बदकी (१०२) ; पंधरा मध्ये भाजप च्या सुशीला भादीकार (८३) , सोळा मध्ये भाजप चे राहुल राठोड (८४) तर सतरा मध्ये सेनेचे जितेंद्र नगराळे (८९) मते घेऊन विजयी झाले.

शेख युसुफ चा एक मतान झाला पराभव.

प्रभाग क्रमांक ८मधील काँग्रेस च्या उमेदवाराचा भाजपचे वैभव सुधाकर पवार यांनी एक मतांनी पराभव केल्याने या प्रभागातील सर्वच समीकरणे जनतेने तोडून पुन्हा एकदा जनता जनार्दन असल्याचे सिद्ध केले आहे.

शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव.

मारेगाव नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक ६ मधील सुलभा संजय लव्हाळे यांचा २६ मतांनी पराभव, प्रभाग क्रमांक क्रमांक ७ मधील सुरेखा किसन भादीकर यांचा ८ मतांनी पराभव ,प्रभाग क्रमांक १० मधील फुलन सुरेश नेहारे यांचा ४० मतांनी पराभव आणी प्रभाग क्रमांक १४ मधील राजू ठेंगणे यांचा ४० मतांनी झालेला पराभव हा शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा ठरणार आहे. हे चारही उमेदवार दिग्गज असल्याने यांचा पराभव हा मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे निर्देश देत आहे. या निवडणुकांतनू निवडणूनका ह्या निष्ठावंत सैनिकांचा माध्यमातूनच जिंकल्या जातात हे स्पस्ट झाले आहे.